Leviticus 18

1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2इस्राएल लोकांना सांग, मी परमेश्वर तुमचा देव आहे. 3तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता त्या देशातील रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका! तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीती प्रमाणेही तुम्ही चालू नका! त्यांचे विधी पाळू नका.

4तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी पाळा! कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. 5म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे!

6तुम्ही कोणीही आपल्याजवळच्या नातलगाशी शरीरसबंध ठेऊ नये! मी परमेश्वर आहे: 7तू तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून आपल्या बापाचा अनादर करु नको. ती तुझी आई आहे, म्हणून तिचा आदर कर. 8तू तुझ्या सावत्र आईबरोबर शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाची लाज उघडी करू नको.

9तू तुझ्या बहिणीशी शरीरकसंबंध ठेवू नको, ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो; ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो तू तिच्यापाशी जाऊ नको. 10तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; कारण ती तुझीच लाज आहे! 11जर तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे; म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको.

12तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे. 13तुझ्या मावशीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे. 14तू तुझ्या चुलत्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवून त्याची लाज उघडी करु नको त्या हेतूने तिच्या जवळ जाऊ नको; ती तुझी चुलती आहे.

15तुझ्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या मुलाची बायको आहे तिच्याशी शारीरिक संबध ठेवू नको. 16तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ह्याप्रकारे त्याची लाज काढू नको.

17एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजेच दोघींशी अथवा तिच्या नातीशी मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो शरीरसंबंध ठेवू नको. कारण त्या जवळच्या नातलग आहेत; असे करणे अतिदुष्टपणाचे आहे. 18तुझी बायको जिवंत असताना तिच्या बहिणीला बायको करून तिला सवत करून घेऊ नको; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.

19स्त्री ऋतुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋतुकालात ती अशुद्ध असते. 20तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको. आणि हे करून अमंगळ होऊ नको.

21तू तुझ्या लेकरांपैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नको. मी परमेश्वर आहे.

22स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे! 23कोणत्याही पशूशी गमन करून त्यासोबत अमंगळ होऊ नको. त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गाविरूद्ध आहे.

24अशाप्रकारे स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुझ्यासमोरुन बाहेर घालवून देणार आहे, तेथील लोकही अश्याच कृत्यांनी अशुद्ध झाले. 25त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहीवाश्यांचा त्याग करीत आहे.

26ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली भयंकर अमंगळ कृत्ये करु नये. 27कारण तुमच्या पूर्वी त्या देशात राहणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ कृत्ये केल्यामुळे तो देश अमंगळ झाला आहे. 28जर तुम्ही या गोष्टी केल्या तर त्यांनी हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील.

29जे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ कृत्य करतील त्या सर्वांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. इतर लोकांनी असली भयंकर अमंगळ कृत्ये केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत; तसली भयंकर अमंगळ कृत्ये करून तुम्ही आपणाला अमंगळ करून घेऊ नये! मी तुमचा देव परमेश्वर आहे!

30

Copyright information for MarULB